जीवनविद्येचा संकल्प आहे की *”हे जग सुखी व्हावं आणि आपलं राष्ट्र सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पुढे जावं”* हे जग सुखी करण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत’ मला एकाने विचारलं की “हे जग सुखी कस होणार ? म्हटलं की जग सुखी करणं सोपं आहे. तुम्हाला सुख पाहिजे ना ! मग सुखी होण्यासाठी तू अमुक अमुक कर ? तर तुम्ही ते कराल ना ! *ही प्रार्थना म्हणा’ तुम्ही सुखी व्हाल.* जगातील प्रत्येक माणसाने ही प्रार्थना म्हणायचं ठरवलं तर सर्वच सुखी होतील.पण माझं म्हणणं असं आहे की जगातील सर्व लोक सुखी होतील तेव्हा होतील पण निदान आपण आपल्या घरापासून तर सुरुवात करूया’ आपल्या कुटुंबातील सर्वांना आपण सुखी करूया. कुटुंबातील प्रत्येकाने जर एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न केला तर कुटुंब सुखी होईल की नाही ! प्रत्येक कुटुंब सुखी झालं तर समाज सुखी होईल. कारण कुटुंब कुटुंब मिळून समाज निर्माण झालेला आहे. समाज समाज मिळून राष्ट्र असं जर करत गेलो तर जग सुखी होणार ! *”होणार म्हणजे होणार” !* एखादा तलाव असतो त्या तलावातील संथ पाण्यात तुम्ही एक खडा टाका’ त्यात एक सर्कल निर्माण होईल. ते सर्कल मोठं होत होत संपूर्ण तलावाला व्यापून टाकील. तस *ही विश्वप्रार्थना या विश्वाच्या तलावात टाकलेला खडा आहे. आणि तो वलय घेत घेत विश्वाला व्यापणार म्हणजे व्यापणारच !*
*सद्गुरू श्री वामनराव पै.*