You are currently viewing गानसम्राज्ञी लताजी…

गानसम्राज्ञी लताजी…

नंदुरबार येथील ज्येष्ठ लेखिका कवयित्री गझलाकार श्रीम.सुनंदा भावसार यांनी लतादीदीना व्यक्त केलेली आदरांजली

मन का झाले कातर-कातर
आज हरवला तो दैवी स्वर !

कशी विधात्या तुझी निर्मिती
घडली दैवी …या अवनीवर…

किती गोडवा आणि सहजता
मूर्तिमंत ते…गाणे —सुस्वर !!

सर्व भावना अन् भावांची…
सर्व गिते तर ती अजरामर…

कसे म्हणावे,स्वप्न संपले…
लहरत आले ते वार्‍यावर…

©®सौ.सुनंदा सुहास भावसार
नंदुरबार 9096349241

प्रतिक्रिया व्यक्त करा