जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी चंद्रशेखर धर्माधिकारी यांची वसंत ऋतूचे आगमन झाल्याची जाणीव करून देणारी अप्रतिम काव्यरचन
आला आला रे आला आला आला वसंत
शिशीर जगता स्रुष्टी सांगे,मनी नको खंत
फाल्गुनाच्या खांद्यावरी,चालली वसंतवारी
वाऱ्यासवे घालूनी रिंगण,ताल धरी संथ
भ्रमला वनी वसंत,वसंत रमला फुलात
होऊनी भुंगा घालतो पिंगा,मधुरस चाखत
ऋतूची या ऐसी थोरवी,सांगतसे चैत्र पालवी
धुंद हिरवा,मोहक गहिरा,बहरात वसंत
आम्रतरुवरी मोहर,कुहुकुहुचे गुंजन मधूर
निनादती वसंत स्वर चैत्रवनात
सोन ऊन्हाचा घोस,गंधबावरा मधूमास
चांदण्यांची बरसात करी,धुंद आसमंत
चंद्रशेखर धर्माधिकारी
वारजे,पुणे ©️