कौटुंबिक सौख्य म्हणजे काय? *दुस-यांचे गुण पाहायला शिका. दुस-यांचे गुण पाहायला सुरूवात कराल तेवढ तुमच कौटुंबीक सौख्य वाढत जाईल. कारण सुख त्याच्यामध्येच आहे.* तुम्ही जर दोष काढायला लागलात तर दोष भरपूर काढता येतील. म्हणून म्हणतात *नां छत्तीस गुण जमले “* म्हणजे फक्त छत्तीसच जमतात बाकी काय गुण आहेत ते जमुन येत नाही. प्रत्येक नवरा बायकोमध्ये न जमलेले गुण खूप असतात.आणि ते छत्तीस गुण जमतात कां नक्की माहीत नाही. कारण प्रत्येक नवरा आणि प्रत्येक बायको ही वेगळी असते. देवानं तशी सांगड घातलेली आहे.एक जर सिस्टेमॅटीक असेल तर दुसरा गचाळ” एक खूप हुशार असेल तर दुसरी साधारण असणार ‘! perfect matching होते कां”? पण तो जर थोडसं बोट ठेवत बसला की तू थोडीशी गचाळ आहे अस झालं की जीवनात बिनसल ! लग्न व्यवस्था ही एकमेकांना पुरक आणि पोषक असते. *एकमेकांचे दोष काढत बसायचं नाही. एकमेकांचे गुण हेरायचे आणि दोष आहेत तिथे आपण उभं राहायच तर कुटुंब चांगल चालत.हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.*
*श्री प्रल्हाद(दादा)वामनराव पै*