सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार राज्य सेवा परीक्षा 2022 ची जाहिरात एप्रिल महिन्यात प्रसिद्ध होणार आहे. तर पूर्व परीक्षा 19 जून, निकाल ऑगस्ट 2022 व मुख्य परीक्षा 15, 16 व 17 ऑक्टोबर 2022 रोजी होणार असून माहे जानेवारी 2023 मध्ये निकाल प्रसिद्ध होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दतात्रय भडकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आज दिली.
प्रसिद्धी पत्रकात स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2022 – जाहिरात मार्च 2022, पूर्व परीक्षा 7 ऑगस्ट 2022, निकाल सप्टेंबर 2022, मुख्य परीक्षा 20 नोव्हेंबर 2022, निकाल जानेवारी 2023. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022- जाहीरात जून 2022, पूर्व परीक्षा 8 ऑक्टोबर, निकाल नोव्हेंबर, मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्र. 1 – 24 डिसेंबर, पेपर क्रमांक 2 पोलीस उपनिरीक्षक – 31 डिसेंबर, पेपर क्र. 2 राज्य कर निरीक्षक – 7 जानेवारी 2023, पेपर क्र. 2 – सहायक कक्ष अधिकारी – 14 जानेवारी 2023, निकाल फेब्रुवारी 2023. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 – जाहिरात जून 2022, पूर्व परीक्षा 5 नोव्हेंबर 2022, निकाल डिसेंबर 2022. मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्र. 1 – 4 फेब्रुवारी 2023, पेपर क्र. 2 लिपीक टंकलेखक – 11 फेब्रुवारी 2023, पेपर क्र. 2 तांत्रिक सहाय्यक 18 फेब्रुवारी 2023, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क 25 फेब्रुवारी 2023, कर सहाय्यक 4 मार्च 2023, उद्योग निरीक्षक 11 मार्च 2023, निकाल एप्रिल 2023.
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – जाहिरात जुलै 2022, पूर्व परीक्षा 26 नोव्हेंबर 2022, निकाल जानेवारी 2023, मुख्य परीक्षा – वनसेवा मुख्य परीक्षा 18 मार्च 2023, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – 25 मार्च 2023, विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा – 2 एप्रिल 2023, यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा- 9 एप्रिल 2023, व या सर्वांचे निकाल मे 2023. कृषी सेवा परीक्षा – 16 एप्रिल 2023, विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 23 एप्रिल 2023 व निकाल जून 2023. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2022 – जाहिरात जून 2022, पूर्व परीक्षा 10 डिसेंबर 2022, निकाल जानेवारी 2023, मुख्य परीक्षा 30 एप्रिल 2023, निकाल जून 2023.
सदरचे वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना, दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो. असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असेही या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
00000