जिल्ह्यातील लोकप्रतिनीधींकडुन आवश्यक असलेला पाठपुरावा होण्याची गरज
सावंतवाडी
जिल्ह्यातील माजगावसह बांदा आणि कलमठ या तीन ग्रामपंचायती शहर म्हणून घोषीत करण्यात आल्या आहेत. तसे नोटिफिकेशन झाले आहे. त्या दृष्टीने विकासाकडे जाण्याची मानसिकता संबधित गावांनी दाखवावी, असेे आवाहन काँग्रेसचे जेष्ठ नेते विकास सावंत यांनी आज येथे व्यक्त केले. दरम्यान नियोजित संकेश्वर, रेडी हा चौपदरी महामार्गाचा चार किलोमिटर परिसर माजगाव मधून जाणार असल्याने आपसुकच गावचा विकास होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. माजगाव येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामसचिवालयाचे उद्घाटन आज श्री. केसरकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी श्री. सावंत बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यातील या तीन ग्रामपंचायतील शहराचा दर्जा मिळाला होता. तशा प्रकारचे नोटिफिकेशन झाले आहे. तत्कालीन सरकारच्या धोरणानुसार कमी जागेत जास्त लोकसंख्या असलेली ठिकाणी निश्चित करण्यात आली होती. त्यापैकी जिल्ह्यातील या तीन ग्रामपंचायतींचा समावेश झाला होता. अर्थात त्यानंतर त्याचे रुपांतर नगरपंचायतीत करणे ही बाब सरकारला आर्थिक दृष्ट्या खर्चिक ठरणार आहे. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यातील देवगड, वैभववाडी, दोडामार्ग या ग्रामपंचायतींना दर्जा देण्यात आला. तसेच याबाबत या ग्रामपंचायतींना शहराचा दर्जा मिळण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडुन प्रयत्न होणे गरजेचे आहे.