You are currently viewing वैभववाडी अर्जून रावराणे विद्यालय येथे मोफत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन वर्ग

वैभववाडी अर्जून रावराणे विद्यालय येथे मोफत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन वर्ग

वैभववाडी परिसरातील विदयार्थांनी याचा लाभ घ्यावा – जयेंद्र रावराणे

आपल्या कोकणात रात्रीच्या सुमारास जत्रोत्सव होतात, परंतु तालुक्यातील विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य घडवण्यासाठी व त्यांना उचित मार्गदर्शन प्रदान करण्यासाठी वैभववाडी मध्ये अर्जुन रावराणे शैक्षणिक संकुलात रात्रीच्या वेळेस “न भूतो न भविष्यती” व्याख्यान उत्सव स्वरूपात निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन चे आयोजन केले आहे. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र व संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक चळवळ राबवणाऱ्या *तिमिरातूनी तेजाकडे* या संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक व व्याख्याते श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आलेले आहे.

सात शैक्षणिक अर्हता धारण असणारे उच्च विद्याविभूषित व सिंधुदुर्ग पुत्र त्याचप्रमाणे व्याख्यानमालेचे प्रमुख मार्गदर्शक श्री. सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाचा लाभ कनिष्ठ तसेच वरिष्ठ महाविद्यालय चे विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या व स्पर्धापरीक्षेची आवड असणाऱ्या वैभववाडी तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी व उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

अर्जुन रावराणे विद्यालय येथे शनिवार, दिनांक १२ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात येणार आहे. आयोजक – जयेंद्र रावराणे, अध्यक्ष, अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी ,रोहन जयेंद्र रावराणे -नगरसेवक वाभवे वैभववाडी नगरपंचायत यांनी वैभववाडी परिसरातील या मोफत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे . मार्गदर्शन वर्गासाठी संपर्क- भास्कर नादकर, मुख्याध्यापक संपर्क क्र.9404754873, अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी , संदीप शिंदे -पर्यवेक्षक संपर्क क्र. 9421235722 तसेच दशरथ शिंगारे महाराष्ट्र राज्य शासन आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक – 9405710080 यांच्याशी संपर्क साधावा.

सर्व कोरोना नियमांचे पालन करून निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचा वैभववाडी तालुक्यातील व परिसरातील इच्छुकांनी लाभ घेऊन आपले उज्ज्वल भवितव्य घडवावे असे आवाहन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा