बांदा
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी बांदा व आजगाव प्रभागाच्या विस्तार अधिकारी श्रीमती दुर्वा गणपत साळगावकर यांची विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी ,अध्यापकचार्य आणि अधिव्याख्याता या गटातून विभागस्तरावरून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे
दरवर्षी उपक्रमशील शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, तसेच अंगणवाडी सेविका व अधिकारी वर्ग यांच्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात येते या मध्ये राज्यभरातील शेकडो शिक्षक अधिकारी या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात.
गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असतानाही विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू राहावे यासाठी विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर यांनी प्रभागातील शिक्षकांच्या मदतीने अनेक नाविन्यपूर्ण सहशालेय उपक्रम स्पर्धात्मक स्वरूपात राबविलेले आहेत या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती करण्याबरोबर मूल्यांची जोपासना करून अध्ययन निष्पत्ती साध्य केल्या आहेत त्यांनी राबवलेल्या या उपक्रमाची दखल घेऊन हा उपक्रम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे या यशाबद्दल सावंतवाडीच्या गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके , सर्व केंद्रप्रमुख व शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन करून करून राज्यसतरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या . या नवोपक्रमासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख ,डाएटचे प्राचार्य ए .पी तावशीकर अधिव्याख्याता डाॅ. लवू आचरेकर ,सुषमा कोंडुसकर यांचे मार्गदर्शन लाभले.