*संवाद मीडियाच्या बातमीचा इम्पॅक्ट*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक हा मोठा जटिल प्रश्न बनत चालला आहे. सरकारचा महसूल बुडवून सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उत्खननातून वाळू माफिया दिवसाला लाखो रुपयांची माया गोळा करतात. त्यामुळे गब्बर झालेले वाळू व्यावसायिक अनधिकृत उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी आलेल्या अधिकारी, कर्मचारी वर्गावर हल्ला करण्यासही धजावत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर महाद्दल प्रशासनाकडून क्वचितच कारवाई होताना दिसते. एका रात्रीत गोवा राज्यात दोनशे डंपर वाळू वाहतूक केली जाते, त्यामुळे गोव्याचा बांधकाम व्यवसाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळूवर अवलंबून असतो. त्यामुळे गोव्यात वाळू विक्री करून वाळू माफिया मोठ्या प्रमाणावर पैसा जमवतात परंतु दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र शासनाच्या तोंडाला मात्र पाने पुसली जातात.
संवाद मीडियाने गेले काही दिवस वाळू प्रश्न उचलून धरला असून सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतात वालावल नदीपात्रातील मसुरे हद्दीत तसेच बांदिवडे खुर्द, कोरजाई, डांगमोडे, सय्यद जुवा आदी ठिकाणी वाळू माफियांनी उभारलेले जवळपास १५ रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. त्यामुळे वाळू व्यवसायिकांत खळबळ उडाली आहे.
पुढील कालावधीमध्ये यापेक्षाही कडक कारवाई करण्याचा इशारा मंडल अधिकारी एस आर चव्हाण यांनी दिला आहे.