You are currently viewing वृक्षारोपण

वृक्षारोपण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ ज्योत्स्ना तानवडे यांचा साकव्य अभंग स्पर्धेत सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त अभंग*

*🌱 वृक्षारोपण 🌱*

बीज अंकुरले | मातीच्या कुशीत |
धरा कृपावंत | आनंदली ||

उन वारा पाणी | मिळण्या पोषण |
विश्वाचे अंगण | बीजा तुला ||

मुळे घट्ट ठेवी | झेप घे अंबरी |
कर्तृत्व अंतरी | ठेवी सदा ||

आला पावसाळा | वसुंधरा दिन |
रोपे जगविन | जीवेभावे ||

झाडे बहुमोल | धन धान्य देती |
शुध्द हवा देती | जगण्यास ||

निसर्गाचा तोल | झाडे ही राखती |
सोयरे सोबती | आपुलेची ||

धरित्रीची माया | मिळे झाडातून |
समृद्धी देऊन | कृपा करी ||

ज्योत्स्ना तानवडे.
वारजे,पुणे.५८

प्रतिक्रिया व्यक्त करा