जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अनिल देशपांडे यांची अप्रतिम काव्यरचना
त्याला तुम्ही सागराचं सांगता,
तेव्हा तो विचार करतो थेंबाचा
आणि तुम्ही सचिन्त;
त्याच्या संकुचितपणावर!
पण तुम्ही कशाला सचिन्त होताय
त्याच्या संकुचितपणावर?
अहो, ज्याला थेंब समजतो,
त्यालाच सागरही नाही का समजणार?
कारण, सागर बनतो थेंबाथेंबानं
आणि तसंच जीवनही घडतं क्षणाक्षणानंच!
म्हणूनच त्याला मिळवू द्या आनंद क्षणाक्षणानं
अन शिकू द्या सारं कणाकणानं
कारण, या कणाकणाच्या शिकण्यानं
अन क्षणाक्षणाच्या आनंदानंच
जीवन सागरालाही तरुन जाईल तो
अगदी थेंबासारखं सहज!
©अनिल देशपांडे®, कोलकाता.
09830463908