वैभववाडी –
माजी आमदार तथा भटके-विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. नरेंद्रजी पवार साहेब यांना मातृशोक 31 जानेवारी 2022 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यादरम्यान असताना तळेरे येथे पवार साहेबांना घराकडून फोन आला. व ही दुःखद बातमी कळली. वैभववाडी येथील दौरा रद्द करून नरेंद्र पवार काही पदाधिकारी यांच्या सोबत मुंबईकडे रवाना झाले.व इतर पदाधिकारी यांनी वैभववाडी कार्यालयाला भेट दिली.
वैभववाडी तालुका भाजप कार्यालयात नरेंद्र पवार यांच्या मातोश्रींना देण्यात आली श्रद्धांजली.यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा कोकण प्रभारी गोविंद गुंजाळकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव अशोकराव चोरमुले, भाजपा संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, धनगर समाज भाजपा ॲड. मिलिंद जाडकर, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष डॉ. उज्वलाताई हाके, युवती प्रदेशाध्यक्षा ॲड.भाग्यश्री ढाकणे, युवा प्रदेश सचिव देवकते, कोकण विभाग अध्यक्ष श्रीराम विधाते, भास्कर यमगर, सौ केकाने मॅडम, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे, वैभववाडी तालुका अध्यक्ष मारुती मोहिते, युवा अध्यक्ष सूर्यकांत बोडके, वैभववाडी नगरपंचायत नगरसेवक तथा गटनेता संजय सावंत, नगरसेविका संगीता चव्हाण, रेवा बावदाने, सुंदरी निकम, स्नेहा माईनकर, यामिनी वळवी, सुप्रिया तांबे, धनगर समाज युवा अनिल कोकरे, नापने ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत बोडेकर,मंगेश कोकरे, कार्यालय प्रमुख आनंद फोंडके आदी उपस्थित होते.या दुःखद बातमी मुळे सर्वत्र शोककळा पसरली असून माजी आमदार नरेंद्र पवार साहेब यांचा वैभववाडी पासून पुढील रत्नागिरी जिल्हा दौरा रद्द करण्यात आला तरवैभववाडी तालुक्यातील नगरसेवकांचा सत्कार करणे व इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले.