सिंधुदुर्गनगरी
जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा उपक्रमाअंतर्गत मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत बुधवार दि. 2 फेूब्रुवारी 2022 रोजी सायं. 4 ते 5 या वेळेत राज्यशास्त्री विषयाची तयारी कशी करावी व अभ्यास करताना येणाऱ्या अडचणींवर मार्ग कसा काढावा याविषयी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. फेसबुक लाईव्हद्वारे https://www.facebook.com/Collector-Office-Sindhudurg-01061044850492 या लिंकवर क्लिक करुन या ऑनलाईन सत्रामध्ये सहभागी होता येणार आहे.
परीक्षेचे स्वरुपापासून विविध शंकांचे निरसन यात होणार आहे. तरी याबाबत कोणतीही शंका, प्रश्न असल्यास आपण ऑनलाईन सत्रामध्ये विचारू शकता. परीक्षाविधीन उपजिल्हाधिकारी स्वाती देसाई व परीक्षाविधीन तहसिलदार संकेत यमगर हे या ऑनलाईन सत्रामध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
यापूर्वी युपीएससी आणि एमपीएससी विषयी मार्गदर्शन सत्र संपन्न झाले आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी-विद्यार्थिंनींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.