You are currently viewing माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते जसवंत सिंह यांचे आज सकाळी निधन

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते जसवंत सिंह यांचे आज सकाळी निधन

नवी दिल्ली :

 

 

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते जसवंत सिंह यांचे आज निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.  २०१४ साली जसवंत सिंह हे त्यांच्या निवासस्थानी पडले होते. यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून जसवंत सिंह यांच्यावर दिल्लीतील लष्करी रुग्णालयात उपचार सुरु होते.  गेल्या ६ वर्षांपासून ते कोमामध्ये होते. दरम्यान, जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे.

 

भाजपाच्या संस्थापक नेत्यांपैकी एक असलेल्या जसवंत सिंह यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएस सरकारमध्ये विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. १९९६ ते २००४ यादरम्यान त्यांनी संरक्षण, परराष्ट्र आणि वित्त मंत्राालय अशा मोठ्या खात्यांचे मंत्रिपद भूषवले होते.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी साडे आठच्या सुमारास ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती देत त्यांना श्रद्धांजली वाहिली. जसवंत सिंह यांची राजकारण आणि समाजाबाबतच्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोनासाठी कायम आठवण काढली जाईल. नरेंद्र मोदींप्रमाणेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ट्विट करत जसवंत सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

जसवंत सिंह यांनी आधी लष्करात आणि त्यानंतर राजकारणात राहून देशाची परिश्रमपूर्वक सेवा केली. अटलजींच्या काळात त्यांच्याकडे महत्त्वाच्या खात्यांची जबाबादारी होती. त्यांनी अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी सांभाळताना आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांच्या जाण्याने मी दु:खी झालो आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील ट्विट करून जसवंत सिंह यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी म्हटले की, बौद्धिक क्षमता आणि देशसेवेसाठी जसवंत सिंह हे कायम स्मरणात राहतील. त्यांनी राजस्थानमध्ये भाजप पक्ष मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले.

 

अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात भाजपाच्या दिग्गज नेत्यांपैकी एक असलेल्या जसवंत सिंह यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात भारतीय लष्करामधून केली होती. त्यानंतर ते राजकारणात दाखल झाले होते. वाजयपेयी सरकारच्या काळा त्यांची कारकिर्दी शिखरावर होती. दरम्यान, जसवंत सिंह यांनी कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहिले. त्यांनी अने वादविवादांचा सामनाही केला. विशेषकरून १९९९ मध्ये कंधार विमान अपहरणावेळी प्रवाशांची मुक्तता करण्यासाठी दहशतवाद्याला घेऊन कंधारला गेल्याने त्यांच्यावर टीका झाली होती. .

 

मात्र वाजपेयी सरकारमधील त्यांचं महत्त्व कायम राहिलं. पुढे एनडीएचं सरकार गेल्यानंतर जसवंत सिंह यांनी २००९ पर्यंत राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिलं. तसेच  दार्जिंलिंगमधील गोरख लँडची मागणी करणाऱ्या स्थानिक पक्षांच्या पाठिंब्यावर ते लोकसभेवर निवडून गेले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा