You are currently viewing लक्ष लागून राहिलेल्या फोंडाघाट एज्युकेशन सोसा.च्या निवडणुकीत ८५ टक्के मतदान

लक्ष लागून राहिलेल्या फोंडाघाट एज्युकेशन सोसा.च्या निवडणुकीत ८५ टक्के मतदान

फोंडाघाट

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या सन २२ ते २७ च्या पंचवार्षिक निवडणुकीत, चुरशीने पार पडलेल्या निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ८८८ मतदारांपैकी ७५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावताना ८५ टक्के मतदान केले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

राजन चिके, मनीष गांधी यांच्या भाजप प्रणीत, विद्यमान विकास पॅनलने सुसज्ज इमारतीचे काम पूर्ण करताना, “आधी केले—” म्हणून निवडणुकीला सामोरे जात, संस्था सुस्थितीत आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न, मतदारांसमोर ठेवला आहे. तर जिल्हा परिषद सदस्य संदेश आग्रे व माजी कृषी सभापती संदेश पटेल यांच्या नेतृत्वाखाली मविआतर्फे संकल्प पॅनेल तयार करण्यात आले असून, संस्थेतील बांधकाम भ्रष्टाचार, शैक्षणिक विकासाचे अभिवचन दिले आहे.

गेल्या ६५वर्षाच्या काळात, याच निवडणुकीत पक्ष पॅनेल निर्माण झाल्याने, सर्वांनीच ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. सोमवारी मतमोजणीअंती दुपारनंतर “कौन कितने पानी में—” हे स्पष्ट होईल आणि १५ संचालक, कार्यकारिणीमध्ये प्रविष्ट होतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा