You are currently viewing लावणी – अँटी

लावणी – अँटी

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे जनसंपर्क अधिकारी विलासजी कुलकर्णी यांची धडाकेबाज लावणी रचना…

सपनात सुदिक मला असं कुणी बोललं न्हाई
ह्यो ह्यो टकल्या मेला मला अँटी बोलला बाई l

चालले होते तोऱ्यात बोलला मला रस्त्यात
वय कशाला बघतो मी बोलले लगेच टेचात
मारत न्हाई बढाई अजुक बेबी बोलते आई
ह्यो ह्यो टकल्या मेला मला अँटी बोलला बाई l

ओठी लावते लाली गालावर पडतेय खळी
बघून मासोळी जाळं टाकून पाहतात कोळी
असल्या येऱ्यागबाळ्याला भावच देत न्हाई
ह्यो ह्यो टकल्या मेला मला अँटी बोलला बाई l

पाहून करडा रंग केसाचा ऐना लागला बोलू
मनात आला राग तरी गुपित कसं मी खोलू
नव्या पिढीची नवलाई लगीन झालंच न्हाई
ह्यो ह्यो टकल्या मेला मला अँटी बोलला बाई l

विलास कुलकर्णी
मीरा रोड
7506848664

प्रतिक्रिया व्यक्त करा