दुर्ग मावळा प्रतिष्ठान ,कोकण विभाग आयोजित, ऐतिहासिक कथाकथन स्पर्धेत केंद्रशाळा बांदा नंबर मध्ये इयत्ता तिसरी मध्ये शिकणारा विद्यार्थी कु. नील नितीन बांदेकर याने, संपूर्ण राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे .
या स्पर्धेमध्ये एकूण दोन फेऱ्या घेतल्या गेल्या.
पहिल्या फेरीमधून पंचवीस उत्कृष्ट कथांची निवड दुसऱ्या फेरीसाठी करण्यात आली आणि या निवडक स्पर्धकांना, दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे कथाकथन साठी विषय देण्यात आले. आणि अंतिम फेरी घेण्यात आली
या दोनही फेरीची एकूण बेरीज करून , नंबर ठरविण्यात आले. यामध्ये नील नितीन बांदेकरने नेत्रदीपक यश साधत द्वितीय क्रमांक संपादन केला.
आतापर्यंत नीलने कथाकथन, चित्रकला, वक्तृत्व, हस्ताक्षर, मॉडेलिंग, यांसारख्या अनेक स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे. त्याच्या यशात बांदा केंद्र शाळेतील समस्त शिक्षक वृंद ,मुख्याध्यापिका सरोज नाईक मॅडम, उपक्रमशील शिक्षक जे. डी पाटील सर तसेच आई- वडील श्री व सौ गौरी नितीन बांदेकर यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले आहे. नीलवर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.