You are currently viewing भाजपा वेंगुर्ले च्या वतीने मातोंड – पेंडुर गावामध्ये दिव्यांगांना ब्लँकेट चे वाटप

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने मातोंड – पेंडुर गावामध्ये दिव्यांगांना ब्लँकेट चे वाटप

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने मातोंड – पेंडुर गावामध्ये कुलदेवता मंदिर येथे दिव्यांगासाठी ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . जागतिक अपंग दिनानिमीत्त वेंगुर्ले मध्ये साई मंगल कार्यालयात दिव्यांगांचा मेळावा आयोजित केला होता , यावेळी काही दिव्यांगांना ब्लँकेट मिळाली नव्हती त्यांना त्यांच्या गावापर्यंत जाऊन ब्लँकेट देण्याचा मनोदय भाजपा वेंगुर्ले च्या वतीने करण्यात आला होता , त्याचाच एक भाग म्हणून मातोंड – पेंडुर गावामध्ये कार्यक्रम आयोजित केला होता .
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस तसेच कार्यक्रमाचे आयोजक ता.उपाध्यक्ष संतोष गावडे मान्यवर म्हणून उपस्थित होते .


यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी भाजपा दिंव्यांग विकास आघाडीच्या वतीने दिव्यांगासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याचे सांगितले .तसेच दिनांक २९ जानेवारी रोजी सकाळी १० = ३० वाजता साईदरबार हाॅल मध्ये विश्व हिंदु परिषदेच्या वतीने अंधांना पांढरया काठीचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले .
यावेळी संतोषी माणगांवकर , मुकेश घोगळे , विजय परब , करिष्मा परब , शैलेश सावंत , प्रशांत शिरोडकर , गोकुळा कवठणकर या दिंव्यांगांना ब्लँकेट चे वाटप करण्यात आले .
या कार्यक्रमाला मातोंड सो.सा.व्हाईस चेअरमन नारायण नाईक , उमेश दळवी , विजय नाईक , प्रकाश गावडे ,मनोहर राऊत , आनंद शिरोडकर , शैलेश सावंत , प्रशांत घोगळे , भरत नेमण , सुनील गावडे इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा