You are currently viewing नवयुवक कला-क्रिडा मंडळ सोनुर्ली, पाक्याची वाडीचे अतुलनीय सामाजिक कार्य

नवयुवक कला-क्रिडा मंडळ सोनुर्ली, पाक्याची वाडीचे अतुलनीय सामाजिक कार्य

पुरग्रस्तांपासून कोरोना काळ…शाळांना दिली भरीव आर्थिक मदत

जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये गावांत वेगवेगळी क्रिडा मंडळे कार्यरत आहेत, क्रिकेट सामने भरवून कितीतरी मंडळे आर्थिक लाभ घेत असतात. काही क्रिडा मंडळे ही सार्वजनिक कार्यात भाग घेतात, रक्तदान सारखे सामाजिक उपक्रम राबवतात. गावांतील अडीअडचणीच्या वेळी धावून जातात.
क्रिडा उपक्रमात असाच भाग घेत असणारे सोनुर्ली, पाक्याची वाडी येथील नवयुवक कला क्रिडा मंडळ क्रिडा स्पर्धांबरोबरच सार्वजनिक क्षेत्रात सामाजिक कार्यात देखील हिरहिरीने भाग घेतात. नवयुवक कला क्रिडा मंडळ, पाक्याची वाडी सोनुर्ली ने आपल्या दातृत्वातून समाजात आदर्श निर्माण केला असून जिल्ह्यातील इतर कला-क्रिडा मंडळांनी देखील त्यांचा आदर्श घेऊन सामाजिक कार्यात भाग घेतला तर गावागावांतील अनेक समस्यांवर योग्य ते उपाय गावातच भेटतील.
नवयुवक कला क्रिडा मंडळ, सोनुर्ली यांनी तालुक्यातील पुरस्थितीच्या वेळी विलवडे, सरमळे, इन्सुली आदी गावांमध्ये ५० हजार रुपयांची भरीव मदत ठेऊन एक आदर्श निर्माण केला आहे. कोरोनाच्या महामारीत देखील सर्वत्र कोरोना रुग्ण भेटत असताना देखील २० हजार रुपये खर्च करून गरजूंना धान्यवाटप केले. सोनुर्ली येथील शाळेसाठी स्मार्ट टीव्ही, प्रिंटर आदींसाठी ५० हजारांच्या घरात निधी उपलब्ध करून दिला आहे. दोडामार्ग येथील एका गरीब मुलाच्या गंभीर आजारासाठी १० हजार असे अनेक वेगवेगळ्या कामांसाठी मंडळाने दीड लाखांच्यावर आर्थिक मदत देत समाजासमोर आदर्श ठेवला आहे. नवयुवक कला क्रिडा मंडळ सोनुर्ली या मंडळाकडून दरवर्षी नियोजन बद्ध क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले जाते. कार्यक्रमाच्या निटनेटक्या आयोजनासाठी मंडळाचे नाव झाले आहे. मंडळाच्या या आदर्शवत कामांसाठी समाजातील विविध स्तरावरून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. मंडळाच्या दातृत्वासाठी अनेकांकडून कौतुक होत असून, जिल्ह्यातील इतर मंडळांनी देखील अशाचप्रकारे समाजाच्या हिताच्या दृष्टीने कार्यरत व्हावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अश्या प्रकारे सामजिक जाणिवेतून काम करणाऱ्या मंडळांनी संवाद मिडिया शी ९४०४९३०१०० यावर मंडळाच्या कार्याची माहिती पाठवावी, त्यातून समाजासमोर मंडळाचे कार्य दाखवले जाईल, मंडळ प्रकाशझोतात येईल आणि समाजासाठी आणखी भरीव कार्य करण्याची त्यांना प्रेरणा मिळेल. जेणेकरून आपल्या सामजिक कार्यावर प्रेरित होऊन इतर मंडळे आदर्श घेतील आणि समाज हिताची कामे इतरांकडूनही घडून येतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा