You are currently viewing वंचित तहसीलदार, वेंगुर्ला यांना शासकीय गाडी मिळवुन देणार..

वंचित तहसीलदार, वेंगुर्ला यांना शासकीय गाडी मिळवुन देणार..

स्थानिक नागरिकांचा एकमुखी निर्धार – समस्त वेंगुर्लावासीय

वेंगुर्ले

तहसील कार्यालय, वेंगुर्ला यांच्या ताब्यात असलेली शासकीय गाडी सुमारे 3 वर्षा पूर्वी शासकीय नियमाप्रमाणे परिपूर्ण प्रस्ताव वरिष्ठांना सादर करून अधिकृतपणे निर्लेखित करण्यात आली परंतु “त्या” जुन्या गाडीच्या बदल्यात नवीन गाडी मागणीचा शासकीय प्रस्ताव शासनाच्याच लालफितीत मागील 3 वर्ष लोंबकळून गर्तेत अडकून पडलाय..

एका बाजूला तहसीलदार या पदावर असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत काम करताना प्रचंड प्रमाणात मानसिक ताण तणाव सहन करावा लागत असून रोजच्या रोज वातानुकूलित अँटी चेंबर मध्ये बसून नवनवीन ढीगभर फतवे तसेच आदेश महाराष्ट्र शासनातील IAS अधिकारी व सर्व कॅबिनेट व राज्यमंत्री काढीत असताना आपल्याच आदेशाचे पालन करताना तहसीलदार पदावर असणाऱ्या व्यक्तीला शासकीय गाडी नसल्यामुळे किती आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास होत असेल हा साधा विचार का येत नाहीत असा यक्षप्रश्न आम्हा सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे..

शासकीय सेवा बजावताना होणारी त्रेधातिरपीट मागील 3 वर्षात लेखी/तोंडी वारंवार विनंती करूनही राज्य सरकार दुर्लक्ष करून त्यांच्याच अधिकाऱ्यांची जाणूनबुजून हेळसांड व अवहेलना नेमकी कशासाठी करतेय याचे उत्तर सर्वसामान्य जनतेला मिळालेच पाहिजे..

आणीबाणीच्या काळात तसेच सध्याच्या आपत्कालीन प्रसंगांना तोंड देण्यासाठी 24 तास शासकीय गाडी जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना अत्यावश्यक असतानाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचित 5 तहसीलदारांना तात्काळ शासकीय गाडी मिळावी यासाठी वेंगुर्लावासीयांचे विशेष शिष्टमंडळ श्री. प्रदीप सावंत – अध्यक्ष, वेंगुर्ला तालुका पत्रकार संघ, वेंगुर्ला व श्री. नंदन वेंगुर्लेकर – सचिव, आधार फाऊंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या पुढाकाराने निवडक नागरिकांना सोबत घेऊन उद्या दिनांक 27/12/2022 रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांना निवेदन देण्यात येणार आहे..

तरी बुद्धीजीवी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री. प्रदीप सावंत व श्री. नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा