मत्स्यव्यवसाय मंत्री, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत २० लाख रकमेचे मालवण वायरी भूतनाथ स्मशान रोड कॉंक्रिटीकरण व संरक्षक भिंत बांधणे या कामास मा.ना. असलम शेख यांनी मान्यता दिली .
तसेच जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१ अंतर्गत वायरी भूतनाथ स्मशान शेड कडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या कामास सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री विकास भाई सावंत यांनी आपल्या अधिनस्त निधीतून रक्कम रुपये पाच लाख मंजूर केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सेवा दल अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर तसेच सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष देवानंद लुडबे यांनी जाहीर आभार मानले.