देवगड
देवगड आगारातील १५ कर्मचाèयांना एस्टी प्रशासनाने सोमवारी बडतर्फीचे आदेश दिले. पंधरा दिवसापूर्वी त्यांना बडतर्फ का करू नये अशा आशयाच्या कारणे दाखवा नोटीसा देण्यात आल्या होत्या मात्र यावर कोणताही प्रतिसाद कर्मचाèयांनी दिला नाही अथवा सुनवाणीसाठी उपस्थित राहीले नाहीत यावर कारवाई प्रस्तावित करून सोमवारी त्यांना बडतर्फ केल्याचे आदेश स्थानिक पातळीवर प्राप्त झाल्याची माहिती स्थानकप्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांनी दिली.
हे आदेश देवगड स्थानकातील भिंतीवर लावण्यात आले आहेत.यापुर्वीच पंधरा कर्मचाèयांना निलंबनाचा नोटीसा देण्यात आल्या होत्या.तद्नंतरही प्रतिसाद न देता त्यांनी संपात सहभाग दर्शविल्याने अखेर ही कारवाई करण्यात आली.पंधरा कर्मचाèयांमध्ये ५ चालक, ५ वाहक व ५ चालक वाहक अशा कर्मचाèयांचा समावेश आहे.या कर्मचाèयांपाठोपाठ सुमारे १७० कर्मचाèयांना कारणे दाखवा नोटीसा देण्यात आल्या आहेत मात्र त्यांनीही अद्याप प्रतिसाद न दिल्याने त्यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे