उच्च-तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे २५ व २६ जानेवारीला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दि. 25 जानेवारी 2022 रोजी दुपारी 2.15 वा. एम.आय.डी.सी. विश्रामगृह, कुडाळ येथे आगमन व राखीव. दुपारी 2.45 वा. कुडाळ येथून मोटारीने सिंधुदुर्गनगरी ओरोसकडे प्रयाण, दुपारी 3 वा. छत्रपती शिवाजी महाराज कृषि महाविद्यालय, ओरोस येथे सदिच्छा भेट. दुपारी 3.30 वा. ओरोस येथुन मोटारीने नाटळ, ता. कणकवलीकडे प्रयाण, दुपारी 4 वा. नाटळ, ता. कणकवली येथे कनेडी ( सांगवे ) कुपवडे, कडावल, नारुर, वाडोस, शिवापूर, शिरशिंगे, कलंबिस्त, वेर्णे, सांगेली, धवडकी, दाणोली, ओटवणे, विलवडे, बांदा रा.मा.190 वरील कि.मी.0/810 मधील मल्हार पुलाचे बांधकाम करणे या कमाच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती, सायं. 5 वा. बिरवंडे, ता. कणकवली येथे सतीश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट, सायं. 6 वा. नांदगाव तिठा, ता. कणकवली येथे शिवसेना पक्ष प्रवेश कार्यक्रमास उपस्थिती, सोईनुसार कार्यक्रम स्थळाकडून मोटारीने एम.आय.डी.सी. विश्रामगृह, कुडाळकडे प्रयाण, सोईनुसार एम.आय.डी.सी. विश्रामगृह, कुडाळ येथे आगमन व राखीव.
बुधवार दि. 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9.15 वा. पोलीस परेड ग्राऊंड, जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिनोत्सवानिमित्त राष्ट्रध्वज वंदन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.30 वा. चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.