जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.निलांबरी गानू यांची रचना
पायी घुंगरू झाल्या
. ..बेभान पिरतीन
चंद्र बघतो मला
ढगाआडून
अहो ssssssराया
तुम्ही चौकीदार व्हा या जवानीच
अंगाखांद्यावर वसंत रुळला
मनी श्रावण आहे उलगडला
रंग डाळिंबी व्हटांवर भाळला
खेळ नजरेत विजेचा चालला
आहे अत्तर घमघमत्या जवानीच
अहोsssss राया
तुम्ही चौकीदार व्हा या जवानीच
गालांवर गुलाब घुटमळला
ओठांवर इश्क दिसे नटलेला
केसांची नागिन हाले पाठीवर
तोरा दाखवीत लचकते कंबर
पावलांचं नातं आहे करदळीच
अहोssss राया
तुम्ही चौकीदार व्हा या जवानीच
*डॉ.निलांबरी*