समाजसेवक, माहिती अधिकार नियोजन समिती संस्थापक अध्यक्ष सांगली जिल्हा अहमद मुंडे यांचा लेख
आपला पहिला गुरू पुस्तकच असते आपल्याला सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक वैयक्तिक वैद्यकीय शालेय सर्व शैक्षणिक क्षेत्रात न्यायालयीन आपल्याला जगाचा आरसा दाखविणारे पुस्तकच असते. माणसाला चांगलं जगणं चांगलं बोलणं उच्च राहणीमान आपल्याला कळणे यासाठी पुस्तक गरजेचे आहे.
रामायण. महाभारत. बायबल. कुराण ज्ञानेश्वरी अशी समाजाला पाप पुण्य याची महती सांगणारी समाजसेवक क्रांतिकारक सेनानी असे बरेच समाजसेवक यांची आपणांस ओळख करून देणारी. गावाचा शहरांचा तालुक्याचा जिल्ह्याचा राज्याचा देशाचा इतिहास त्यामधील नविन गोष्टी जगासमोर आणण्यासाठी लिहिणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या आत्ताच्या पिढीला कळत या गावात देशात काय होतें.
आज आपली वाचनातील गोडी कमी झाली कारण आज मोबाईल फोन, ट्विटर, फेसबुक, ई-मेल, हाॅटस्पॉट अश्या माध्यमांमुळे लोक मोबाईल वर अडकून पडली. रांत्र दिवस लोक मोबाईल वर बसायला लागली. भूतपूर्व पंतप्रधान राजीव गांधी यांनी माझा इंडिया डिजिटल इंडिया झाला पाहिजे यासाठी कॅमपुटर. इंटरनेट मोबाईल अशी उत्पादने तयार करण्यात आली. आज याचा वापर चांगल्या कामासाठी कमी आणि वाईट कामासाठी जास्त होण्यास सुरुवात झाली
आज ग्रंथालय ऱ्हास होण्यास सुरुवात झाली आहे आज आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये ग्रंथालय असतें ते एका जुन्या घरांत त्याचे छप्पर पावसाळयात गळतं आणि त्यातील काही काही पुस्तकावरील धुळ सुध्दा झाडली जातं नाही ग्रंथालय लाईट नाही असेल तर वाचता येणयापुरतीच वाचायला येणारी यांची संख्या बोटावर मोजता येईल एवढी. ग्रंथालयात जुनी नवीन पौराणिक ऐतिहासिक कथा आत्मचरित्र अशी बरीच दुर्मिळ पुस्तके वाचायला मिळतात पण आज लोकांना याबद्दल जागृत करण्याची गरज आहे आपण बघतो आज रस्त्यावर सेल लावून जमिनींवर ठेवून पुस्तके विक्रीसाठी ठेवली जातात म्हणजे जगाला आधार जीवन मंत्र देणारी पुस्तके आज रस्त्यावर आली आहेत केवढी मोठी शोकांतिका आहे
आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य आपण बाजारपेठेत बघतो लाखों रुपये खर्च करून टोलेजंग चप्पल शोरुम असतें. आतील फर्निचर लाख रुपये असतं. लाईट म्हणाला की पाचसे ते हजार वॅट चे बल लावून सर्वच झगमगाट असतो किती मोठी तफावत आहे. ज्ञानाचा प्रचार प्रसार प्रसिध्दी करणारे आज रस्त्यावर आले आणि चप्पल शोरूममध्ये सजविलेले जाते चप्पल किंमत १०० पासून १० हजारांच्या वर सुद्धा असेल म्हणजे अशा आणि एवढया महाग चप्पल ची जागा सुध्दा तशीच पाहिजे पण ज्ञानाचा दिवा लावणारे रस्त्यावर. आजचं आपणं मनांत ठाणून ठरवून आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये शाळांमध्ये जिथे जिथे ग्रंथालय आहे तेथें ग्रंथालयांचे पुनर्भरण करण्याची गरज आहे आपला वेळ आणि थोडा पैसा या ग्रंथालयासाठी खर्च करण्याची गरज आहे
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार आत्ता संस्था पतसंस्था बॅंका सर्व आर्थिक वित्तीय संस्था यांना दाखल करता येणार आहे
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९