पर्यावरण सेलचे राष्ट्रीय कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष समीर सुभाष वर्तक यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व त्यांच्या हस्ते मातोंडचे धडाडीचे कार्यकर्ते बाळू ऊर्फ प्रफुल्लचंद्र देवराव शिवसेनेतून राष्ट्रीय काँग्रेस स्वगृही परतले. बाळा गावडे यांनी लवकरच बाळू यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येईल असे सांगितले त्याचबरोबर बाळू परब यांनी लवकरच असंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेशाचा मोठा कार्यक्रम मातोंड या गावी करण्यातील असे वचन दिले. यावेळी प्रांतिक सदस्य हिरोजी ऊर्फ दादा परब ,पर्यावरण सेलचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय पाटील प्रदेश सचिव हर्षद खंडागळे पर्यावरणप्रेमी कुंदन नाईक सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी यांनी बाळू परब यांचे स्वागत व अभिनंदन केले .

मातोंडचे धडाडीचे कार्यकर्ते बाळू ऊर्फ प्रफुल्लचंद्र देवराव परब यानचे शिवसेनेतून राष्ट्रीय काँग्रेस स्वगृही परत
- Post published:जानेवारी 21, 2022
- Post category:बातम्या / वेंगुर्ले
- Post comments:0 Comments
You Might Also Like

कोकण रेल्वेच्या विविध प्रश्न संदर्भात प्रवासी संघटनेचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

चंदनाची शेती करा लाखात नाही तर कोटीत कमवा

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ भडगाव येथे निलमताई राणे यांची बैठक संपन्न
