सिंधदुर्ग जिल्यातील देवगडमधील तरुणाचे भारतातील पहिले ‘तारका’ इलेक्ट्रिक आउटबोर्ड
आनंदवाडी येथील अनीश कोयंडे याचा ‘तारका’ आविष्कार
देवगड
सध्याच्या जगात पेट्रोल, डिझेलचे दर मर्यादेपेक्षा वधारत असताना, देवगड मधील आनंदवाडी गावातील अनीश कोयंडे या तरुणाने इलेक्ट्रिक आउटबोर्ड म्हणजे, इलेक्ट्रिक इंजिन चा शोध लावला आहे. यागोदर भारतात इलेक्ट्रिक बोटिंचा अविष्कार झाला आहे, पण बैटरी वर चलणाऱ्या इंजिन चा हा पहिलाच आविष्कार अनीश ने करुन दाखवला आहे.
इलेक्ट्रिक वर चालणारी टू व्हीलर आणि फोर व्हीलर आली, पण देवगड मधील अनीश कोयंडे या तरुणाने आपल्या सर्व मच्छीमार बांधवांचा विचार करता तारका नावाचे इलेक्ट्रिक आउटबोर्ड इंजिन तयार केले आहे. या अगोदर आपण यामाहा किंवा सुझुकि कंपनीच्या पेट्रोल वर चालणाऱ्या मोटार इंजिन पहिल्या असतील, तर पेट्रोल च्या खर्चापेक्षा ९०% बचत करत हे इलेक्ट्रिक इंजिन तुम्हाला १० व्हावात समुद्रात न्हेउन परत किनाऱ्यावर आणू शकत. अनीश कोयंडे याने कोणतीही एंजिनिअरींग न करता फक्त इलेक्ट्रॉनिक विषयक अभ्यास आणि 3 वर्ष सातत्याने मेहनत घेत हे इलेक्ट्रिक आउटबोर्डचे पहिलेले स्वप्न सत्यता उतरवले आहे.
हे इंजिन पूर्णपणे मेड इन इंडिया असून, यामध्ये सर्व यंत्रणा आणि स्पेयर पार्ट्स, हार्ड वेयर हे भारतीय दर्जाचे आहे. अनीश कोयंडे म्हणजे देवगड मासेमारी सोयायटीचे चेअरमन द्विजकांत कोयंडे यांचा सुपुत्र. द्विजकांत कोयंडे आणि संपूर्ण कोयंडे कुटुंबिय गेली कित्येक पीढ्या मासेमारी व्यवसायत असल्याने अनीश ला देखील त्याची लहानपनापसुन रुचि निर्माण झाली होती. अनीश ची असलेली जिद्द, चिकाटी आणि कौटुंबिक आधाराच्या जोरावर त्याने हा करिष्मा करुन दाखवला आहे.