You are currently viewing २२ व २३ रोजी मनसे तर्फे शारीरिक तपासणी ॲक्युप्रेशर व फिजिओ तपासणी शिबिर

२२ व २३ रोजी मनसे तर्फे शारीरिक तपासणी ॲक्युप्रेशर व फिजिओ तपासणी शिबिर

आपल्याला कोणत्या प्रकारचा आजार झाला हे मनुष्याला बऱ्याच वेळा कळत नाही, किंवा त्याची लक्षणे सहजासहजी दिसत नाही. अशावेळी आपली आरोग्य तपासणी करून योग्य ते उपचार सुरू ठेवल्यास आजाराची लक्षणे समजण्यास मदत होऊ शकते. तसेच एखादा गंभीर आजार झाल्यास त्याला येणारा खर्च सुद्धा मोठा होतो. मात्र योग्य वेळी अगोदरच शारीरिक तपासणी केली. तर होणाऱ्या त्रासाला व आर्थिक अडचणी ला आपण नियंत्रणात आणू शकतो.

यासाठी संपूर्ण शारीरिक तपासणी ॲक्युप्रेशर व फिजिओ तपासणी शिबिर मनसेतर्फे दि.२२ जानेवारी व २३ जानेवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत श्री. रवळनाथ मंदिर ओटवणे या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. मनसे आणि तेजस्विनी हेल्थकेअर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रिपोर्ट प्रत नोंदणी शुल्क नाममात्र १०० रुपये ठेवण्यात आला आहे. तरी या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन मनसे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, प्रभाकर गावकर,संतोष सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा