💡 *प्रश्न : समाजात पुष्कळ वेळा आपण पहातो की दुर्जन लोक सुखी जगतात तर त्याच्या उलट सज्जन माणसे दुःखात खितपत पडलेली असतात तर मग कर्माचे फासे असे उलटे कसे पडतात?*
✅उत्तर : *दुष्कर्म करणारी दुर्जन माणसे सुखी दिसतात याचा अर्थ ती सुखी असतात असा नाही,किंबहुना ती सुखी नसतातच.* दुसरा मुद्दा असा की *निसर्गाचे नियम जगातील सर्व लोकांना सारखेच लागू असतात व त्याला अपवाद सुद्धा नाहीत. निखाऱ्यावर जर पाय पडला तर तो भाजणारच मग तो मनुष्य सज्जन असो किंवा दुर्जन असो.त्याप्रमाणे निसर्गाच्या नियमांना जे लाथाडतात त्यांच्यावर त्यांनीच निर्माण केलेल्या नियतीकडून जीवनात लाथा खाण्याचे प्रसंग येतात. याच्या उलट निसर्गाचे नियम लक्षात घेऊन जे आचरण करतात त्यांना सुखी जीवनाचा लाभ होतो.* तिसरा मुद्दा असा की, *जीवनात जी आपण सुख-दु:खे भोगतो त्या सुख-दुःखांची फळे पूर्वी आपण जी शुभ आणि अशुभ कर्मे केलेली असतात त्यांची फळे असतात. आज आपण जी शुभ-अशुभ कर्मे करतो त्यांची बरी-वाईट फळे आपल्याला भवितव्यात मिळणारी असतात.* झाड लावले आणि लगेच फळ मिळाले असे कधीच घडत नाही,त्याचप्रमाणे जीवनातही तसाच प्रकार घडत असतो.
*~ सद्गुरु श्री. वामनराव पै.*
💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏