मान.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी अनुदगार काढल्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कठोर कारवाई करणेबाबत भाजपा वेंगुर्ले च्या वतीने पोलिस निरीक्षक तानाजी मोरे यांना निवेदन देण्यात आले .
यावेळी देशाच्या पंतप्रधानांना अशा पध्दतीने बोललेले भाजपा सहन करणार नाही , तसेच नाना पटोले यांच्यावर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा भाजपा शिष्टमंडळाने दिला.
यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर , उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व वसंत तांडेल , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , नगरसेविका श्रेया मयेकर व कृपा मोंडकर , परबवाडा सरपंच पपु परब , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ , बुथप्रमुख शेखर काणेकर व नितीश कुडतरकर , महिला मोर्चा च्या रसीका मठकर व आकांक्षा परब , युवा मोर्चा चे भुषण सारंग , शैलेश मयेकर व ओंकार चव्हाण इत्यादी उपस्थित होते .