जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांची स्फुटकाव्य रचना
खरंच विसरून गेलीस का गं…
तू दिलेली ती वचने?
कि विसरून गेलीस तू मलाही?
नाही रे… वचनांमध्ये अडकून तर बंधनात मी बांधली गेले..
तू आठव तुझं माझ्यासाठी झुरणं
माझ्या एका हास्यासाठी…
तुझं खोटं खोटं रुसणं..
माझी गुलाब कळी खुलताच..
तू माझ्याकडे आकर्षून येणं..
माझा स्पर्श होताच..
तुझं रोम रोम शहारणं..
तुझ्या नजरेत सामावून घेताना..
नजरेनेच नजरेशी बोलणं..
अन…
तुझ्या मिठीत शिरताच..
तू तुझाच न उरणं…
खरंच भेटत नाही का रे मी तुला आजही तुझ्या मिठीत?
का शहारे येत नाहीत…माझ्या प्रेमळ आठवणीत??
वचनात नाही घेतले मी बांधून..
श्वासातच राहिले मी…
तुझा श्वास बनून…
©[दिपी]✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६