कुडाळ :
“बॅरिस्टर नाथ पै असते तर बेळगाव प्रश्न एवढ्यात निकाली निघाला असता व बेळगाव महाराष्ट्रामध्ये कधीच समाविष्ट झाला असता. असे उद्गार बॅरिस्टर नाथ पै यांच्या खांद्याला खांदा लावून बेळगाव सीमा प्रश्न च्या लढ्यात सहभागी झालेले त्यांचे परममित्र, स्वातंत्र्यसैनिक विठ्ठल याळगी यांनी काढले .ते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे तर्फे आयोजित बॅरिस्टर नाथ पै यांच्या ५१व्या पुण्यतिथी निमित्त व १९व्या संस्था वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना ते बोलत होते. त्यानी आपल्या पुढील मनोगतामध्ये” राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकार्य करणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे नाथ पै.निरिच्छ भावनेने, प्रामाणिकपणाने व सामाजिक हिताच्या तळमळीने काम करणारे, मराठी माणसाच्या अस्मितेचा सन्मान करीत नीतिमत्ता सदाचार व भारतीय सांस्कृतिक परंपरांचा आदर करणारा सुसंस्कृत राजकारणी म्हणजे बॅरिस्टर नाथ पै होय “.असे सांगत बेळगाव सीमा चळवळींमध्ये बॅरिस्टर नाथ पै यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना डायनाम्याशिवाय डबल सीट सायकलचा प्रवास करत असताना पोलिसांना नाव माहीत नसताना स्वतः पोलीस स्टेशन मध्ये जाऊन अपराधाची दिलेली कबुली, जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांना दहशत बसावी म्हणून पोलीस स्टेशन जाळत असताना मनुष्य होणार आणि होणार नाही याची खबरदारी घेणारे नाथ पै. प्रकृती बरी नसताना डॉक्टरांनी विश्रांती घ्यावी असं म्हटलेले असतानासुद्धा बेळगावी जनतेच्या सन्मानासाठी भाषण देणे. हे त्यांच्या दुःखद निधन कसे कारणीभूत ठरले.अशा विविध प्रसंगांची उपस्थितांना आठवण करून दिली . श्रुती यान तर्फे उमेश गाळवणकर जयप्रकाश चमणकर अरुण मर्गज आदिती पडे पियुशा प्रभू तेंडुलकर यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत आज माणूस माणुसकीची ओळख विसरत चालला आहे .भ्रष्टाचार बोकाळला आहे .स्वातंत्र्य प्रेम कमी झाले आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण केले जात आहे .मतांच राजकारण ,राजकारण्यांची विकृत स्वरूपं .तरुण पिढी व्यसनांच्या आहारी चालली आहे. याबद्दल खंत व्यक्त करीत आजच्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना बंधुभाव शिकवावा .राष्ट्रप्रेमाचे धडे द्यावे. व्यसनांचे दुष्परिणाम शिकवावेत. म्हणजे देशाची प्रगती होईल असे सांगत बॅ.नाथ पै प्रेमी व्यक्तींशी संवाद साधता आला. त्यांना आत्मानुभव कथन करता आले याबद्दल समाधान व्यक्त केले . *(विशेष म्हणजे भाषणाच्या अगोदर पहाटे चार वाजेपर्यंत ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे बोलू शकत नव्हते, पण नाथ पै यांच्या वरचे प्रेम, आणि नाथ पै बद्दल मी बोलणार या जिद्दीमुळे त्यांच्या डॉक्टर कन्ये ने केलेल्या उपचाराला प्रतिसाद देत ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एक- सव्वा तास भाषण करू शकले)*.
यावेळी व्यासपीठावर जयप्रकाश चमणकर, उमेश गाळवणकर, डॉक्टर सुरज शुक्ला, प्रा.परेश गावडे,प्रा. अरुण मर्गज, प्रा.कल्पना भंडारी,ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अर्जुन सातोस्कर, जयराम डिगसकर इत्यादी उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व देवी सरस्वती व नाथ पै यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रमुख अतिथी म्हणून बोलताना जयप्रकाश चमणकर यांनी..” आपल्या कार्यकर्तृत्वाने सामाजिक लोकप्रियतेच दालनखुले करणारे बॅरिस्टर नाथ पै होत. असे सांगत विचारांचे नियोजन सामाजिक चळवळ व सांस्कृतिक विचारधारा ने संपृक्त अशा व्यक्तिमत्वाचं उपस्थितांचा परिचय करून दिला.
त्यांचे नाव सार्थक लावण्याचे काम बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था करीत आहे .ही समाधानाची बाब असल्याचे नमूद करीत बॅ. नाथ पै शिक्षण संस्था महाराष्ट्राचे शांतिनिकेतन ठरो. असे सांगत तुमची मानवता व सामाजिक बांधिलकी अशी अखेरपर्यंत कार्यरत राहून महाराष्ट्राचे सुसंस्कृत शैक्षणिक संकुल म्हणून बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचा नावलौकिक वाढो.असा आशीर्वाद दिला. यावेळी शिक्षण संस्थेतर्फे नाथ पै पुण्यतिथी निमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील स्पर्धकांना (प्रथम क्रमांक युक्ता प्रकाश नार्वेकर ,द्वितीय क्रमांक पार्वती धोंडी कोदे ,तृतीय क्रमांक अमित महेश कुंटे, उत्तेजनार्थ विठ्ठल संजय सावंत ,शमिका सचिन चिपकर इ.ना) सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, अनुक्रमे तीन हजार ,दोन हजार, एक हजार रू उत्तेजनार्थ पाचशे पाचशे रोख रक्कम देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋचा कशाळीकर, प्रास्ताविक प्रा. अरुण मर्गज व उपस्थितांचे आभार परेश धावडे यांनी मानले.