You are currently viewing बिनभिंतीच्या शाळेच्या निर्मात्याला – साद घालते वाबळेवाडीची शाळा

बिनभिंतीच्या शाळेच्या निर्मात्याला – साद घालते वाबळेवाडीची शाळा

राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेने मा. आयुक्त ( शिक्षण )व मा. शिक्षण संचालक प्राथमिक यांच्याकडे निवेदनाद्वारे वेधले लक्ष . पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी या आंतरराष्ट्रीय शाळेचे प्रणेते राष्ट्रपती पुरस्कार विजेते उपक्रम शील शिक्षक दत्तात्रय वारे यांच्यावर प्रशासकीय कारवाही म्हणून झालेल्या निलंबन बाबत फेरविचार करण्याकरिता वत्यांना दोषमुक्त करण्याकरिता व न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघांच्या वतीने शिक्षण आयुक्ताकडे निवेदनाद्वारे मागणी.

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय पुरस्कार विजेते व बिन भिंतीच्या आंतराष्ट्रीय शाळेचे प्रणेते उपक्रमाशिल , विविध पुरस्कार प्राप्त शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित करून त्यांच्यावर अन्यायकारक कार्यवाही केल्यामुळे राज्यातील सर्व शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे.
वाबळेवाडी येथील शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा निर्माण करून राज्यातील सर्व शिक्षकांना प्रेरणा देण्याचे कार्य दत्तात्रय वारे सरांनी केले आहे. शाळेची विद्यार्थी पटसंख्या 7वर्षापुर्वी केवळ 34होती. 2 शिक्षक कार्यरत होते.दत्तात्र्य वारे यांची बदली वाबळेवाडी या शाळेत झाल्यानंतर त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट कार्य करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून त्यांनी फक्त 7वर्षात ३०० लोक वस्ती असलेल्या ग्रामस्यांच्या सदकार्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा बनविली आहे.शाळेला विविध कंपन्या कडून देणग्या मिळाल्या असुन या देण्यामधून शाळाच्या वर्ग खोल्या बिभिंतीच्या बनवल्या असुन विद्यार्थी संख्या जवळपास 750पर्यंत वाढविली आहे.शाळेतील विद्यार्थी गुणवत्ता पुर्ण शिक्षण घेत असुन शासनाच्या विविध स्पर्धा परिक्षेत नाविण्यपूर्ण सहभाग असुन स्पर्धा परिक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवले आहे.ही शाळा राज्यातील सर्व शिक्षकांना प्रेरणादायी ठरलेली आहे.राज्यातील शिक्षकांनी या शाळेला भेट देऊन या शाळेतील विविध उपक्रम पाहून राबविले आहेत.दत्तात्र्य वारे हे महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांसाठी मार्गदर्शक ,प्रेरणादायक ठरलेले असतांना अशा शिक्षकांवर निलंबन करून कारवाई केल्यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.काम करणा-या शिक्षकांवर अन्यायकारक कारवाई झाल्यामुळे शिक्षकवर्ग भयभीत झाला असुन निशब्द झाला आहे.प्रेरणादायी ठरलेल्या दत्तात्रय वारे यांच्यावर झालेले कारवाई अन्यायकारक असुन राज्यातील उपक्रमशिल शिक्षकांवर यांचा परिणाम होणारी असल्याने,ही कारवाई मागे घेऊन सन्मानपुर्वक त्यांना त्याच शाळेवर पदस्थापना देऊन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त,उपक्रमशिल शिक्षकाला न्याय देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाच्या वतीने राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी,शिक्षण संचालक दिनकर पाटील यांची राज्यातील सर्व राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या वतीने राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या प्रतिनीधीनी भेट घेऊन निवेदन दिले व दत्तात्रय वारे गुरुजींना दोषमुक्त करण्याची मागणी केली आहे.या वेळी शिक्षण आयुक्त कार्यालयातील सहसंचालक श्रीराम पानझडे यांनी निवेदन स्वीकारून सकारात्मक चर्चा केली आहे.झालेल्या कारवाईची चौकशी सुरू असुन प्रशासन न्याय देण्याचे काम करेल असे आश्वासन राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.या वेळी राज्याध्यक्ष – सुभाष जिरवणकर, राज्यकार्याध्यक्ष -दशरथ शिगारे, राज्य सरचिटणीस -अनंता जाधव, कोषाध्यक्ष – डॉ.पाकिजा पटेल, राज्यप्रवक्ता -सुनिल गुरव,राज्य सहसचिव =माधव वायचाळ राज्य उपाध्यक्ष -संभाजी ठुबे, जिल्हा अध्यक्ष -रमेश गंगावणे, भिमराव शिंदे, शिवराज सावंत,संजय गिरी , यासह आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा