काव्यनिनाद, सदाबहार काव्यांजली, कवितांजली ग्रुप च्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री स्वाती गोखले यांची अप्रतिम काव्यरचना
कोवळ्या कोवळ्या उन्हात सोवळे माझे मन ग !
सोवळ्या माझ्या मनात सावळे सावळे विचार ग !
सावळ्या माझ्या विचारांना लख्ख उजेड हवा ग !
शुभ्रधवल मालेनी लख्ख प्रकाश मनात ग !
का उठले काहूर अशा अवेळी मनात ग ?
कसे सारू दूर मनातल्या विचारांना ग ?
विचार माझे वाहतात, डोळ्यांना लागल्या धारा ग !
धारेतून त्या वाहून गेल्या माझ्याच भावना ग !
कसे मी सावरू हे भावनांचे ओझे अनिवार ?
हळुवार भावनाच त्या ओझेही जणू अलवार….
अलगद निरागस भावनांना हात घालतात वेदना मनातल्या…
बाहेर पाऊस, मनात असतो निचरा दवबिंदूंचा डोळ्यातल्या…
लोभसवाणा हा सोहळा लोचनातील लावण्याचा !
निसर्गातील जणू रंगमेळा मनातील सृजनाचा !
सौ.स्वाती गोखले.
पुणे.