You are currently viewing महसूल विभागाची अवैध वाळू उपसा करणाऱ्या होड्यांवर धडक कारवाई; होड्या टाकल्या जाळून

महसूल विभागाची अवैध वाळू उपसा करणाऱ्या होड्यांवर धडक कारवाई; होड्या टाकल्या जाळून

सावंतवाडी

तालुक्यातील आरोंदा येथील गोवा व जोडलेल्या तेरेखोल खाडीत अवैद्य रित्या बेसुमार उपसा करणाऱ्या तीन ते चार होड्यावर कारवाई करत त्या होड्या जाळण्यात आल्या. महसूल विभागाने केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैद्य
उपसा करत असलेल्याना चांगलाच दणका बसला. ही कारवाई आज, सोमवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली.
आरोंदा येथील तेरेखोल खाडीत मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा करण्यात येत होती. यासंबंधी अनेक तक्रारी महसूल प्रशासनाकडे आल्या होत्या. अनेक वेळा कारवाईचे इशारा देऊनही ही वाळू उपसा थांबत नव्हती. त्यामुळे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी या विरोधात धडक कारवाई केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा