भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वैभववाडी महाविद्यालयाचे आयोजन.
वैभववाडी
महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित
आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वैभववाडी इतिहास विभाग आणि IQAC विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त
भारताच्या जडणघडणीतील ७५ वर्षे- चळवळी व विकासाचे प्रवाह (१९४७ ते २०२१) या विषयावर ‘आंतरविद्याशाखीय आँनलाईन राष्ट्रीय परिषद-२०२२’ दि.२८ जानेवारी, २०२२ रोजी आयोजन करण्यात आले आहे. या आंतरविद्याशाखीय ऑनलाईन राष्ट्रीय परिषदेमध्ये प्राध्यापक, संशोधक व लेखक यांना शोधनिबंध सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. तसेच या परिषदेमध्ये ‘उच्च शिक्षणातील शैक्षणिक बदल’ या विषयावर डॉ.डी.टी. शिर्के, कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, ‘भारतीय राष्ट्रवादाचे आकलन : स्वातंत्र्य आंदोलन व वर्तमान प्रस्तुतता’ या विषयावर डॉ. किशोर गायकवाड, इतिहास व मानववंश विज्ञान विभाग, मिझोराम विद्यापीठ, ‘भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील देशासमोरील आव्हाने आणि तरुणीची भूमिका’ या विषयावर मा.भुजंगराव बोबडे, संचालक, हस्तलिखित संशोधन विभाग दख्खन पुरातत्त्व व सांस्कृतिक संशोधन केंद्र, हैदराबाद व अमृत महोत्सव आणि महिला विकासाची सकारात्मकता या विषयावर डॉ. प्राजक्ती वाघ-भोसले, राजश्री शाहू कला विज्ञान महाविद्यालय महाविद्यालय वळूज, औरंगाबाद या तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत.
या ऑनलाईन परिषदेचे नियम-
१. ऑनलाइन राष्ट्रीय परिषदेमध्ये देशातील सर्व संशोधक, प्राध्यापक अभ्यासक, लेखक व विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी.
२. संशोधकांना खाली दिलेल्या विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर मराठी/हिंदी/English या भाषेत आपला शोधनिबंध सादर करता येईल. शोधनिबंध यापूर्वी कोठेही सादर केलेला अथवा प्रकाशित झालेला नसावा व शोधनिबंधावर संशोधकाचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर व Email लिहलेला असावा (शब्द मर्यादा 2000 ते 3000 )
३. मराठी व हिंदी भाषेसाठी युनिक कोड (मंगल) व इंग्रजीसाठी Times of Roman या फाँडचा वापर करावा.
(फाँडसाईज १२ व ओळीतील अंतर १.५ असावे).
४. आपल्या संशोधन पेपरची PDF file व word file अशा दोन्ही फाईल्स पाठवाव्यात.
५. प्राप्त शोधनिबंध ISSN /ISBN क्रमांकाच्या आंतरराष्ट्रीय ई-पुस्तकात प्रकाशित केले जातील.
६. सोबत आपल्या शोधनिबंधाचा गोषवारा /सारांश कथन करणारा ४ ते ५ मिनिटाचा व्हिडिओ पाठवावा.
७. दर्जेदार व्हिडिओ आयोजक महाविद्यालयाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात येतील.
८. Online राष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संशोधक, विद्यार्थी व प्राध्यापकांना ई-प्रमाणपत्र दिले जाईल.
९. दि. २५ जानेवारी २०२२ पर्यंत आलेल्या शोधनिबंधांचा व व्हिडिओंचाच विचार केला जाईल.
१०. परिषदेसाठी प्रवेश शुल्क रु.५००/- राहील.
नोंदणीसाठी लिंक
👉🏻 Link – https://forms.gle/kQdQQkPg6W3RyMHD8
नोंदणी फीसाठी बँक खात्याचा तपशील-
प्राचार्य, आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी.
बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा वैभववाडी
*A/C – 60248334490*
*IFSC Code – MAHB0001634*
या राष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी खालील WhatsApp लिंकवर क्लिक करून खास परिषदेसाठी तयार केलेला ग्रुप Join करावा.
https://chat.whatsapp.com/KbcvVO5G9ZtFaLWy05QiVG
ऑनलाईन राष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदेचे विषय
१. राजकीय
२. सामाजिक
३. आर्थिक
४. सांस्कृतिक व क्रीडा
५. शिक्षण व साहित्य
६. शेती, उद्योग आणि व्यापार
७. शहरीकरण
७. विज्ञान,तंत्रज्ञान आणि आरोग्य
९. सहकार, ग्राहक चळवळ
10. अंधश्रध्दा निर्मूलन
12. महिला सबलीकरण
13. शेतकरी, कामगार
14. वाहतूक,दळणवळण व पर्यटन
15. भारताचे आंतरराष्ट्रीय धोरण
इत्यादी विविध विषयावर संशोधन पेपर सादर करू शकता.
संशोधक, विद्यार्थी व प्राध्यापकांनी आपले संशोधन पेपर व संशोधन पेपरची व्हिडिओ क्लिप
ऑनलाईन राष्ट्रीय परिषदेचे समन्वयक
प्रा.एस.एन.पाटील
(इतिहास विभाग प्रमुख-9834984411) ई-मेल sureshpatil1127@gmail.com यांच्याकडे सादर करावे. अधिक माहितीसाठी IQAC समन्वयक डॉ.डी.एम.सिरसट
( 9403867293) महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.सी.एस.काकडे (9850960026) यांच्याशी संपर्क साधावा.
प्राध्यापक, संशोधक व लेखक यांनी लवकरात लवकर आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून आपला शोधनिबंध वेळेत पाठवून सहकार्य करावे असे आवाहन महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.