*मराठी राजभाषा हस्ताक्षर स्पर्धा २०२२*
मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. तिचे संरक्षण व संवर्धन ही आपली जबाबदारीआहे. लेखक, कवी, कीर्तनकार व संत यांनी जे मराठी वांड्मय निर्माण करून ठेवले आहे, तो मराठी भाषेचा एक अनमोल ठेवा आहे. हा ठेवा, वारसा आपल्याला पुढच्या पिढीला सोपवत गेले पाहिजे. आपल्या मुलांना मराठी भाषेची ओळख, मराठी साहित्याची जाण, मराठी भाषेशी जवळीक निर्माण करून देण्याची जबाबदारी आपलीच आहे.
कोरोना काळात ऑनलाइन अभ्यासामुळे मोबाईल आणि कॉम्प्युटर मार्फत मुलांचे शिक्षण चालू होते. या ऑनलाईन अभ्यासात हस्तलेखन कुठेतरी मागे पडत होते, कारण सर्व गोष्टी कॉम्प्युटरच्या की-बोर्डवर किंवा मोबाईलच्या कीपॅड वरुन होत होत्या. मुलांमध्ये मराठी हस्तलेखनाची आवड निर्माण व्हावी व स्वच्छ, सुवाच्य हस्तलेखनाचे महत्त्व त्यांना कळावे ही उद्दिष्ट समोर ठेवून बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाने हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले आहे.
वर्तमानपत्र व आजची पिढी-आपली मुलं-आपल्या राष्ट्राचे भवितव्य यांचा सुसंवाद प्रस्थापित व्हावा हा उद्देशही या स्पर्धे मागे आहे. वर्तमानपत्र हा समाजाचा, जनमानसाचा राजकारणाचा, अर्थकारणाचा, संस्कृतीचा आरसाच असतो. म्हणूनच सर्व सुशिक्षित, उच्चशिक्षित, विद्वान व अतिमहत्वाची मंडळी नित्यनियमाने सकाळी सर्वप्रथम वर्तमानपत्र हाताळताना दिसतात.
हस्ताक्षर स्पर्धेमध्ये मुलांना आपणास आवडणाऱ्या कोणत्याही मराठी वर्तमानपत्रातून वहीचे एक पान भरेल एवढा मजकूर आपल्या हस्ताक्षरात लिहावयाचा आहे. वर्तमानपत्रातील मजकुराचे कात्रण वहीच्या डाव्या पानावर चिटकवायचे आहे व आपला मजकूर उजव्या पानावर लिहावयाचा आहे. किमान पंचवीस पान भरलेली वही स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. दि. २२ जानेवारी २०२२ पासून ते २७ फेब्रुवारी २०२२ पर्यंत प्रकाशित होणाऱ्या कोणत्याही मराठी वर्तमानपत्रातील रोज एक पान याप्रमाणे आपण वहीत लिहू शकता. वर्तमान पत्राचे कात्रण चिकटाविल्यानंतर त्याखाली वर्तमानपत्राचे नाव व दिनांक लिहावा.
व्हाट्सअप संपर्क : 81695 53964
*स्पर्धेचे अटी व नियम*
स्पर्धेचा कालावधी – दिनांक २२ जानेवारी २०२२ ते २७ फेब्रुवारी २०२२ (मराठी राजभाषा दिन)
दिनांक २२ जानेवारी २०२२ ते २७ फेब्रुवारी २०२२ या ३५ दिवसां मधून कोणत्याही २५ वेगवेगळ्या दिवसाच्या वर्तमानपात्रा मधून २५ मजकूर लिहणे बंधनकारक असेल.
वहीचा आकार ६ इंच x ८ इंच असावा.
वही स्विकरण्याची अंतिम तारीख – ५ मार्च २०२२.
खालील पत्त्यांवर वह्या स्विकारल्या जातील :-
१) १५/१, बी.डी.डी . चाळ, डिलाईल रोड, ना.म. जोशी मार्ग, लोअरपरळ (पू), मुंबई – १३
२)४०२, अभिलाषा बिल्डींग, प्लॉट नंबर ८६, डेलीकसी हॉटेलच्या वरती, एस. व्ही. रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०००६७.
३) इमारत क्रमांक 4 / 401, गणेश आशीर्वाद को . हौ. सो., भारत नगर समोर, टागोर नगर विक्रोळी ( पूर्व ) मुंबई 400083.
एक व्यक्ती एकाच गटात सहभागी होऊ शकते.
वहीवर आपले नाव, पत्ता, इयत्ता आणि मोबाईल नंबर व शाळेचे नाव नमूद करणे आवश्यक आहे.
सुंदर, वळणदार आणि व्याकरणाच्या चुका नसलेले लेखनाचे प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक निवडले जातील.
हस्ताक्षराची कसोटी न लावता, ‘स्पर्धकाने वर्तमानपत्रा मधून मजकूर लिहिण्यासाठी निवडलेले विषय’ यासाठी २० उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील.
विजेते आणि सहभागी स्पर्धकांना ई – प्रमाणपत्र देण्यात येईल.
स्पर्धेचा निकाल वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात येईल.
हि स्पर्धा विनामूल्य आहे याची सर्वानी नोंद घ्यावी.
स्पर्धेबाबतचा अभिप्राय वहीच्या शेवटच्या पानावर लिहावा.
आयोजकांचा निर्णय अंतिम राहील.
हि स्पर्धा मुंबई विभागापुरती मर्यादित असेल.