रिक्षा संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
कुडाळ
कुडाळ साई मंदिर समोरील एल पी जी गॅस अचानक बंद करण्याचा निर्णय त्या पंपाच्या मालकांनी घेतला आहे त्यामुळे आज कोरोना महामारीत भरडलेला रिक्षा चालक अडचीत आला आहे. आज पंप बंद झाला तर रिक्षा चालकावर ऊपासमारीची वेळ येणार आहे.
कोरोना मुळे त्रस्त झालेल्या रिक्षा चालकाने कंटाळून आत्महत्या केली तर याला जबाबदार कोण? असा सवाल कुडाळ रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी केला आहे.
कोरोना महामारी संपेपर्यंत व गॅसपंपाची दुसरी व्यवस्था होईपर्यंत पंप बंद अथवा दुसऱ्या जागेत हलवु नये,
गॅसपंप असल्याने गॅसच्या रिक्षा खरेदी केल्या आहेत. पंप बंद झाला तर माझ्या रिक्षा चालकांची कुटुंब रस्त्यावर येतील
तरी आपण यावर विचार करून आम्हाला योग्य न्याय द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.