जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य पत्रकार, लेखक कवी सागर बाणदार यांची काव्यरचना
तसा मी कधीच
ठरवून नव्हतो जगलो ,
दुस-यांना मनानं दुखावण्यासारखं
मुद्दाम नव्हतो वागलो !
कदाचित हेच तंत्र
सुखावं असावं ना ,
आता जगून झालेल्या क्षणांनी
मला हेच सांगावं ना !
मुळातून अंकुरणं हेही निमित्तच
आकाशाला गवसणी घालत भेटण्याचं ,
उन्हात सावली बनून जगताना
नसे भय आयुष्य सरण्याचं !
आता माझ्या देहावरच्या सुरकुत्या
वाटतात ना तुला कुरुप ,
पण ,त्या खोलवरच्या खुणा
आहेत जगलेल्या अनुभवाचे रुप ,
तसा ,आज मी निरुपयोगी
कोण कसा ठरवेल तसा ,
वादळवारा ,ऊन ,पाऊस झेलूनही
मुळांशी घट्ट नात्याचा ठसा !
पानगळ अन् पुन्हा बहरणं
ही तर जगण्याची रित ,
असं सारं माझ्याजवळ असताना
का नाही फुलणार प्रित…!
– सागर बाणदार
मो.८८५५९१५४४०