जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ सदस्या प्रा.सौ.सुमतीपवार यांची काव्यरचना
शील कुल निश्चयी प्रभावी मुर्ती होती महान
कालकार्य अवघा छोटासा जय जवान जय किसान …
आदर्श जीवन आचार संहिता वामन धैर्यशाली
मार्ग दाविला भारतास हो दुनिया स्तिमित झाली…
शिक्षण सोडून चळवळीत ते व्रत स्वदेशी झाले
श्रीवास्तव होते शास्री झाले आजोळीच वाढले
पितृछत्र हरपले बालपण कष्टातच गेले
झोकून दिले स्वातंत्र्यास्तव समाजसेवक बनले ..
मवाळ तितके होते निश्चयी जगताने पाहिले
मृदुमुलायम पुष्प साजिरे प्रभुचरणी वाहिले
स्वतंत्रता ती स्रियांची अन् व्रत होते स्वदेशी
घेऊन येती काय चांगले पाहून देश विदेशी …
परमप्रिय ती भारतभूमी स्वप्न हरित क्रांतीचे
सीमे वरती लढती जे कौतुक जय, जवानांचे
शान वाढवी देशाची जो झाला पंतप्रधान
देशासाठी आणि गमविला पहा त्याने प्राण …
किती तो जगला पेक्षा जगला कसा असे महान
देशासाठी ओवाळून हो टाकले पंचप्राण
विस्मृतीत तो कधी न जाईल असा होता नेता
ललामभूत तो भारतास हो होता भाग्यविधाता ….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : ११ जानेवारी २०२२
वेळ : सायं: ५:१३