You are currently viewing राज्य शासनाच्या उदासीननेमुळे एसटी कर्मचारी उद्विग्न ; स्वेच्छामरणासाठी मागितली परवानगी

राज्य शासनाच्या उदासीननेमुळे एसटी कर्मचारी उद्विग्न ; स्वेच्छामरणासाठी मागितली परवानगी

मालवण आगारातील एसटी कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

मालवण :

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण व्हावे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. शासनाकडे वारंवार मागणी करूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने मालवण आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा मरणाच्या परवानगीची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मालवण तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार जी. एम. कोकरे यांच्याकडे हे निवेदन सुपूर्द करण्यात आले. यावेळी मालवण एसटी कर्मचारी काका खोत, हेमंत तळवडकेकर, दीपक ढोलम व अन्य कर्मचारी उपस्थित होते. या निवेदनावर मालवण आगारातील सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.

मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात असेही म्हटले आहे, महाराष्ट्र राज्याचे प्रमुख या नात्याने एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीन करून राज्य सरकारी कर्मचारी यांच्या प्रमाणे सेवा जेष्ठतेनुसार पदानिहाय वेतनश्रेणी देऊन आम्हाला आर्थिक व मानसिक त्रासातून मुक्त करावे. आम्हा एसटी कर्मचारी यांना जीवदान द्यावे. अन्यथा आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी कर्मचारी यांनी निवेदन पत्रातून केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा