You are currently viewing कणकवलीतील शिवाजी महाराज पुतळा स्थलांतराबाबत पालकमंत्र्यांचा निर्णय

कणकवलीतील शिवाजी महाराज पुतळा स्थलांतराबाबत पालकमंत्र्यांचा निर्णय

कणकवली

कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरणबाबत निर्णय देताना पालकमंत्री उदय सामंत यांनी शिवाजी चौक मित्रमंडळ व सकल मराठा समाज प्रतिनीनिधींनी सुचवलेल्या दिपणाईक वर्कशॉप जवळील जागेत पुतळा स्थलांतरण करण्यास मान्यता दिली.मात्र सदर शासकीय 18 गुंठे जागेतील अतिक्रमण केलेल्या सर्व स्टॉलधारकांना नोटीस काढून सर्व जमीन ताब्यात घेऊन नंतरच अधिकृतपणे पुतळा स्थलांतरित केला जाईल असे पालकमंत्र्यांनी आज झालेल्या बैठकीत सांगितले.

त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा स्थलांतरणाचा प्रश्न पुन्हा एकदा लांबणीवर तर पडलाच आहे. पण आता नव्याने या 18 गुंठे जागेतील व्यवसायिकांना स्थलांतरित करून पुनर्वसन करण्याचा मुद्दा येत्या काळात पेटण्याची शक्यता आहे. तसेच जर 18 गुंठे शासकीय जागा पूर्णता मोकळी केली गेल्यास या जागेत असणाऱ्या सध्याच्या व्यावसायिकांवर देखील गदा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतर संदर्भात अजून काही महिने वाट बघावी लागणार आहे.ओरोस येथे झालेल्या या बैठकीत पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, शिवसेना नेते संदेश पारकर, सतीश सावंत, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अधीक्षक अभियंता छाया नाईक, मराठा समाजाचे भाई सावंत, सुशील सावंत, बबलू सावंत, महेश सावंत, किशोर राणे, तेजस राणे, अशोक करंबेळकर, राजेंद्र पेडणेकर, नगरसेवक ऍड. विराज भोसले आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा