३५० असंघटीत कामगारांची नोंदणी
वेंगुर्ले
भाजपाच्या वतीने मोफत ई -श्रम कार्ड नोंदणी व कार्ड वाटप कार्यक्रमाचे आयोजन शनिवार ८ जानेवारी रोजी साईदरबार हाॅल, सुंदरभाटले – वेंगुर्ले येथे करण्यात आले होते. यावेळी सुमारे ३५० असंघटीत कामगार व लाभार्थी यांनी सहभाग घेतला. तसेच ६५ लाभार्थ्यांना ई – श्रम कार्ड चे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता, पंडित दिनदयाळ उपाध्याय, डाॅ.शामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतीमेस जेष्ठ नेते बाळा सावंत, वसंत तांडेल व उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी प्रास्ताविक करताना जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी मोदी सरकारच्या गेल्या सात वर्षातील अंत्योदयाच्या योजनांची माहिती दिली. तसेच अंत्योदयाची कल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने कशाप्रकारे सातत्याने प्रयत्न केले याची माहिती दिली.
तसेच अनेक योजना, ज्याप्रमाणे पंतप्रधान जनधन योजना, अटल पेन्शन योजना, दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल योजना , स्वामीत्व योजना , आत्मनिर्भर भारत योजना , स्थलांतरीत मजुरांसाठी श्रमशक्ती पोर्टल , स्फूर्ती , पंतप्रधान कौशल विकास योजना , ई – स्कील इंडिया , पंतप्रधान युवा योजना , पंतप्रधान उजाला योजना , पंतप्रधान सहज बिजली हर घर योजना ( सौभाग्य ) , पंतप्रधान सुरक्षा विमा योजना , पंतप्रधान आयुष्यमान योजना , पंतप्रधान जनऔषधी योजना अशा विविध योजना देशातील गोर गरीब जनतेसाठी आणुन व त्यांचे जिवन सुखकर करण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले .
यावेळी प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक नारायण सावंत यांच्या माध्यमातून मोफत ई – श्रम कार्ड कॅम्प चे यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले .
यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर , उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर , महीला तालुकाध्यक्षा स्मिता दामले , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक – वसंत तांडेल व बाळा सावंत , माजी नगराध्यक्षा डाॅ. पुजा कर्पे , नगरसेविका पुनम जाधव – कृपा मोंडकर – श्रेया मयेकर , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , परबवाडा सरपंच पपु परब , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस , शक्ती केंद्र प्रमुख गणेश गावडे , ता .चिटनीस समीर चिंदरकर – समीर कुडाळकर , किसान मोर्चा जि.सरचिटणीस बाळु प्रभु , ता.का.का.सदस्य बिट्टु गावडे , महिला मोर्चा च्या रसीका मठकर – मानसी परब , बुथप्रमुख शेखर काणेकर – नितीश कुडतरकर – विनय गोरे – गुरुनाथ घाडी – वसंत परब – नारायण गावडे , युवा मोर्चा चे भुषण सारंग , ओंकार चव्हाण इत्यादी उपस्थित होते .सदर कार्यक्रमामध्ये कोरोना नियमांचे पालन केले .