कृष्णांक महोत्सवाचे शानदार उदघाटन…
मालवण
कोरोना कालावधीत नाट्यचळवळ सुरू ठेवताना रंगकर्मींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. परंतु नाट्यकर्मीनी संटकांचा सामना करताना नाट्यचळवळ सुरू ठेवली. नाट्यचळवळ रहावी यासाठी स्वराध्या फाऊंडेशन नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. रसिकांचे मनोरंजन व प्रबोधन करण्याचे व्रत स्वराध्या फाऊंडेशनने अवितरणपणे सुरू ठेवावे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी येथे केले.
येथील स्वराध्या फाऊंडेशनच्यावतीने रुक्मिणी कृष्णा नेवगी यांच्या स्मरणार्थ कृष्णांक महोत्सव २०२२ पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृह येथे आयोजीत केला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक नितीन वाळके, रूजारिओ पिंटो, गावडे, संजय गावडे, संध्या परूळेकर, सुगंधा नेवगी, स्वराध्याचे अध्यक्ष रूपेश नेवगी, सुशांत पवार, गौरव ओरसकर, अभय कदम, महेश काळसेकर, गौरेश काजरेकर, सचिन टिकम, शांती पटेल, सुधीर कुर्ले, सौम्या कुर्ले, विलास देऊलकर, विधिता मोंडकर आदि उपस्थित होते.
श्री. नेवगी म्हणाले, कै. रूक्मिणी कृष्णा नेवगी यांच्या स्मरणार्थ कृष्णांक महोत्सवाचे आयोजन केले आहे. रंगभूमीची सेवा करण्यासाठी अशा महोत्सवाचे आयोजन केले आहे. एकांकिका, दीर्घाक आणि नाटक अशा तिन्ही नाट्यप्रकारांचा समावेश असणार आहे. कोरोनाबाबतचे नियम पाळून कृष्णांक महोत्सव सादर केला जाणार आहे.
श्री. पवार म्हणाले, स्वराध्या फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षी एकांकिका महोत्सव घेतला जात होता. परंतु कोरोना नियमांमुळे गत दोन वर्षात महोत्सव घेता आला नाही. कृष्णांक महोत्सवाचे आयोजन केले आहे. यावेळी नितीन वाळके, संध्या परूळेकर यांनी मनोगते व्यक्त केली. सुत्रसंचालन सुशांत पवार यांनी केले. सुधीर कुर्ले यांनी आभार मानले.