जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेक्षक कवी मुबारक उमराणी यांचा अप्रतिम लेख
काही लोकांचा कॅमेराचा
प्रकाश झोत
आमच्या पर्यंत पोहचत नाही
कारण त्याच्या डोळंयात आम्ही नसतो.
डोळ्याच्या अगोदर मनात असावी लागते ओढ ,
गाय वासरा सारखी ………..!
मनाच्या ही आत आम्ही हवे असतो
ओढीत आत्मियतेच्या, आपुलकिच्या नसानसात ..!
मगचं हातातील कॅमेरा नकळत
आमच्या कडे फिरेल.
डोळे पहातील, बोटे हळूचं क्लिक
करतील, मन हसेलं …….!
आठवणी कायम राहतील
डोळे प्रसंग आठवतील ….
आयुष्य म्हणेल अजून थोडं जग
बेट्या……!
मी सगळ्यांना सांगत सुटेनं !
हे बघा मी मी येथे आहे बघा ना!
मग बघणारे म्हणतील साल्या
सगळीकडे कसा असतोस रे!
काही काम धंदा आहे का नाही ?
लोक काहीही म्हणोतं …………!
त्यांना दिसता येत नाही म्हणून
ते बोलतील मला काय त्याचे ….!
आम्ही मात्र दुस-यांचे दुःख उगाळून
त्याचा टिळा सगळ्यांना लावत सुटतो.
शेवटी लोक आमचाचं उदो उदो
करतात …कारण……………..!
आपला उदो उदो करावा म्हणून. ..
स्वतःचे अस्तित्व शोधण्यासाठी .
इथे प्रत्येक जन शोधतो आहे
स्वतःला …………!
पण एक .गौतम पुन्हा दिसावा म्हणून…………..!
एक भीमराव धडपडला,
गौतमाची मुल्ये पुन्हा अंकुरावी
म्हणून…………..!
अनेक भीमानी जन्म घेतला अन्
दास्यत्वाच्या साखळ्या खळाखळा
तुटल्या …………….!
वा-यांनी दिशा बदलल्या ……..!
अन् एक एक जागा झाला …….!
बोलू लागला, गावू लागला …..!
कविता सादर करू लागला…..!
तेव्हा……………………!
सगळयांचे डोळे क्लिक झाले
मना मनात प्रतिमा उभ्या राहिल्या,
त्याची छबी सगळ्यांच्या डोळ्यांत
ठामपणे बसली कधी न पुसण्यासाठी .
किंचित डोळे उघडे ठेवून ………!
जगाचं सत्य शोधण्यास बसलेल्या
गौतमाकडे एक भीमराव गेलाच
ना …. जातीयतेचे कलंक पुसण्यासाठी
मग त्याचा प्रकाश झोत सा-या
आसमंतात पसरतो .
आम्ही सारेच प्रकाशित होतो.
जिथे जातो तिथे हा प्रकाश…..
सा-यांना प्रकाशित करतो……
क्लिक चा आवाज न करताचं….!
धन्य…… ते …..दोधे ………!
.गौतम………! भीमराव….!
“बुद्धम सरणंम् गच्छामी!………!”
मुबारक उमराणी.
शामरावनगर सांगली
मो.९७६६०८१०९७.