You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अतुल काळसेकर यांचे नाव चर्चेत…

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अतुल काळसेकर यांचे नाव चर्चेत…

१३ जानेवारीला होणार स्पष्ट; मनीष दळवींसह विठ्ठल देसाईंना सुद्धा संधी मिळण्याची शक्यता…

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवड १३ जानेवारीला होणार आहे. दरम्यान सद्यस्थितीत अध्यक्षपदासाठी अतुळ काळसेकर यांची चर्चा असून सहकारातील अनुभव दांडगा असल्यामुळे त्यांचे पारडे जड आहे. तर मनिष दळवी व विठ्ठल देसाई यांना सुद्धा संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमकी अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
बँकेची अध्यक्षपदाची निवडणुक १३ तारखेला होवू घातली आहे. तसे काल कुडाळच्या प्रांताधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता या ठीकाणी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण बसणार ? राणे कोणाला संधी देणार आहे ? हे चित्र काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. यातील चर्चेत असलेल्या अतुळ काळसेकर यांनी या आधी ५ संचालक पद भुषविलेले आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांचा सहकारात दांडगा अनुभव असल्यामुळे अध्यक्षपदासाठी त्यांचे पारडे जड आहे. तर मनीष दळवी व विठ्ठल देसाई हे सुद्धा सोसायटीच्या माध्यमातून कार्यरत असल्यामुळे त्यांचीही या पदांसाठी वर्णी लागू शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे. सावंतवाडी तालुक्यातील गजानन गावडे हे सुद्धा दावेदार आहेत. गावडे यांनी यापूर्वी एकदा जिल्हा बँक अध्यक्षपद भूषविले आहे. तसेच सध्या ते जिल्हा मजूर संस्था फेडरेशन अध्यक्ष आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा