You are currently viewing ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत सावंतवाडीत विद्युत वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन…

‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत सावंतवाडीत विद्युत वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन…

सिंधुदुर्गात सर्वात प्रथम चार्जिंग स्टेशन उभी करणारी सावंतवाडी ठरली पहिली नगरपालिका…

सावंतवाडी

शहरातील जगन्नाथ भोसले उद्यानासमोर माझी वसुंधरा अभियानांतर्गत चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. त्यामुळे आता शहरातील विद्युत वाहनांना चार्जिंग करणे सोयीचे होणार आहे. या दोन चार्जिंग स्टेशन वर एका वेळेस आठ विद्युत वाहणे चार्जिंग होणार आहेत, अशीमाहिती आरोग्य विभागाचे अधिकारी श्री. नाटेकर यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की माझी वसुंधरा अंतर्गत शहरातील जनतेमध्ये विद्युत वाहनांबाबत जनजागृती व्हावी यासाठी दोन चार्जिंग स्टेशन उभारण्यात आली असून संपूर्ण सिंधुदुर्गात सर्वात प्रथम चार्जिंग स्टेशन उभी करणारी सावंतवाडी ही पहिली नगरपालिका ठरली आहे. इंधनाच्या गाड्या वापरल्याने होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी विद्युत वाहने वापरावीत असे आवाहन याद्वारे पालिकेने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा