कणकवली
मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक, आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जन्मभूमी असलेल्या पोंभूर्ले येथील स्मारकात आज पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्यास तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी पत्रकार दिना दिवशी आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जन्मभूमी असलेल्या पोंभूर्ले येथील पुण्यभूमीत नतमस्तक होऊन अभिवादन केले जाते.
याप्रसंगी जांभेकर यांचे वंशज सुधाकर जांभेकर तसेच तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय मारकड व उपाध्यक्ष उदय दुधवडकर यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी पत्रकार संघाचे सचिव संजय खानविलकर,खजिनदार निकेत पावसकर,सदस्य सचिन राणे,गुरूप्रसाद सावंत,संजय शेळके,सतिश मदभावे,अनिल राणे,अस्मिता गिडाळे,प्रमोद कोयंडे,सदाशिव पांचाळ,लक्ष्मण आढाव उपस्थित होते.तसेच तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या दळवी महाविद्यालयाचे प्रा.हेमंत महाडिक व मासमेडिया विभागाचे विद्यार्थीही उपस्थित होते.विद्यालयाच्यावतीने तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्या सर्व पत्रकारांना पुष्पगुच्छ देऊन पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने यंदाचा देण्यात येणारा उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे सदस्य गुरुप्रसाद सावंत यांना जाहीर करण्यात आला.त्याबद्दल तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्या वतीने गुरुप्रसाद सावंत यांना सुधाकर जांभेकर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.