तू समोर चालताना,
पाठमोरी तुला पाहताना,
वाटायचं…
कधीतरी तू मागे वळून पाहशील,
माझ्याकडे पाहून..
स्मित हास्य करशील.
मैत्रिणींच्या घोळक्यात असता,
खदखदून हसताना,
वाटायचं…
कधीतरी तू माझ्याकडे बघशील,
माझ्या जवळ येऊन,
माझ्या कानात कुजबुजशील.
तलावाकाठी बसलेली असता,
नजरेला नजर भिडताच,
वाटायचं…
कधीतरी तू मला पाहून लाजशील,
नजरेला नजर देऊन,
हळूच माझ्या नजरेत बसशील.
अजूनही वाटतंय,
कधीतरी तू समोर येशील,
माझ्या हाती हात देशील,
माझ्या मिठीत येऊन,
सर्वस्वी माझी होशील…
कधीतरी तू….
(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६