मनसे सरचिटणीस उपरकर यांच्या संकल्पनेतून ऑनलाइन कोव्हिड शब्दांकन स्पर्धा स्पर्धेचे आयोजन…
मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांची माहिती…
जिल्हयातील कोरोना रूग्णांच्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांकडून अयोग्य पद्धतीने कामकाज सुरू आहे. रॅपिड अॅटिजन टेस्टबाबत विश्वासार्हता नसताना या टेस्टवर भर दिला जात असून त्यामधून पॉझिटीव्हची संख्या वाढत आहे. शासकीय रुग्णालये तसेच तालुकानिहाय कोविड सेंटरकडे होणारे दुर्लक्ष, तेथील रुग्णांची होणारी गैरसोय, खरेदीतील घोटाळा, चढ्या दराच्या निविदा तसेच उपसंचालक पातळीवर नर्सेसच्या बदल्यांमध्ये सुरू असलेल्या गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर मनसेच्यावतीने आंदोलने करण्यात आली होती.
नुकतेच मनसेच्यावतीने जनता मदत केंद्र ओरोस येथे जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर सुरू करण्यात आले आहे. या मदत केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना होणारा त्रास दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे
आता मनसे रुग्णांना आलेले अनुभव एका अनोख्या स्पर्धेद्वारे विचारणार आहे.माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस परशुराम(जीजी) उपरकर यांच्या संकल्पनेतुन ऑनलाइन “कोव्हिड शब्दांकन स्पर्धा” सोमवार दि.२८ सप्टेंबर ते शनिवार १० आॕक्टोबर पर्यत आयोजित करण्यात आली आहे.
सदर स्पर्धेसाठी पुढील मुद्दे आवश्यक असणार आहेत.
१.घरापासून रुग्णालयापर्यंत व रुग्णालयापासून घरापर्यंत आपणास व आपल्या नातेवाईकांना आलेले चांगले-वाईट अनुभव.
२.रुग्णालयात दाखल असताना आपणास आलेले चांगले-वाईट अनुभव.
३.रुग्णालयात मिळणारी व्यवस्था,डॉक्टर सेवा,जेवण,नास्ता,पाण्याची उपलब्धता
४.रुग्णालयात एखाद्या व्यक्तीचा कोव्हिड ने मृत्यु झाल्यानंतर होणारी परिस्थिति.
५.शासन व लोकप्रतिनिधींबद्दल आपले असलेले मत.
शब्दांकन मर्यादा ८०० ते १००० असणार आहे
स्पर्धेत भाग घेवू इच्छिणाऱ्यानी sindhudurgmnsmedia@gmail.com किंवा ९४२३३०२४२२ वर व्हाट्सअप वर आपले नाव पत्ता संपर्क क्रमांक व शब्दरुपी माहिती पाठवायची आहे.प्रथम क्रमांक २०००/-,द्वितीय क्रमांक १०००/- व तृतीय क्रमांक ५००/- तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाणार आहे.
तरी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त कोव्हिड रुग्णांनी भाग घेऊन त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना आलेले अनुभव शब्दांमद्धे मांडून सहभागी व्हावे असे आवाहन या स्पर्धेचे आयोजक मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर व विल्सन गिरकर यांनी केले आहे.